पाण्यासाठी काळविटाला गमवावा लागला जीव

May 3, 2012 10:41 AM0 commentsViews:

03 मे

राज्यातील दुष्काळाचा फटका माणसांबरोबर प्राण्यांनाही बसतोय. पाण्याच्या शोधार्थ गावाजवळील तलावाकडे आलेल्या काळवीटाला आपला प्राण गमवावा लागला आहे. काळवीट आमगाव जवळच्या तलावात पाणी प्यायला जात असताना गावातील शिकारी कुत्र्यांनी या काळविटाचा चावा घेवून त्याला ठार केलं. जंगलात वनविभागाने प्राण्यांना पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत उपलब्ध करुन दिले नाहीत. त्यामुळे प्राण्यांना मानवी वस्तीकडे जावं लागतंय. गोंदिया वनविभागाने या जंगलात हौद केवळ कागदोपत्रीच बांधल्याचा आरोप प्राणीमित्रांनी केला आहे.

close