विद्यार्थ्यांना मारहाण कराल तर जेलमध्ये जाल

May 4, 2012 9:10 AM0 commentsViews: 4

04 मे

'छडी लागे छम..छम..विद्या येई घमं..घमं…' असं म्हणत विद्यार्थ्यांना बदाडून काढणार्‍या गुरुजींना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. विद्यार्थ्यांना शारिरीक इजा पोहोचवणाया गुरुजींना शिक्षा ठोठावण्यासाठी बालगुन्हेगार कायद्यात बदल क रण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. जर प्रस्ताव मंजूर झाल्यास शिक्षा देण्यास गुरुजींना सात वर्षाची शिक्षेची तरतूद करण्यात येणार आहे. यात वेगवेगळ्या टप्यावर शिक्षेची तरतूद असणार आहे. गुरुजींच्या मारहाणीत विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्यास एक वर्ष, विद्यार्थ्याला गंभीर जखमा आल्यास 4 वर्ष, नेहमीच अशा प्रकाराची मारहाण करणार्‍या गुरुजीना 7 वर्षाच्या शिक्षेची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. या तरतुदीमुळे पालकांनी स्वागत केलं आहे.

close