पाण्यासाठी महिलांचे हंडा आंदोलन

May 4, 2012 9:50 AM0 commentsViews: 1

04 मे

कोकणातही आता पाणी टंचाई तीव्र होत चालली आहे. लांजा तालुक्यातल्या चिंचुर्डी गावातल्या महिलांनी पाण्यासाठी पंचायत समितीसमोर हंडे घेऊन धरणं आंदोलन केलं. गेले आठ दिवस या गावात पाण्याचा टँकरच गेलेला नाही . 40 कुटुंब आणि 200 पाळीव जनावरं असलेल्या या वस्तीला पाण्याचा एका हंड्यासाठी रोज 10 किलोमिटरची पायपीट करावी लागत आहे. सरकारच्या जीआर नुसार एका कुटुंबाला फक्त 40 लीटर पाणी मिळतंय. पण हे पाणीही सध्या या कुटुंबांना मिळेनासं झालंय.

close