गृहमंत्री माघारी जाताच नक्षलवाद्यांकडून दोघांची हत्या

May 4, 2012 10:06 AM0 commentsViews: 1

04 मे

गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या गडचिरोलीचा दौरा करुन चार दिवस झाले नाहीतर, पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी दोघांची हत्या केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या सिंधेसूर गावातल्या 2 नागरिकांची नक्षलवाद्यांनी हत्या केली आहे. मधुकर कापगते या कंत्राटदार आणि विनायक लोहंबरे या विमा प्रतिनिधींची नक्षलवाद्यानी हत्या केली. पोलिसांचे खबरे असल्याच्या संशयावरुन यांची हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गृहमंत्री आर आर पाटील यांनी नक्षलग्रस्त एटापल्ली आणि अहेरी तालुक्यात स्वत: फिरुन भेटी दिल्यात. या भागात आर.आर.पाटील यांनी जनतेशी आणि जवानाशी संवाद साधला. नक्षलवाद्यांनी दोन आठवड्यांपूर्वी हत्या केलेल्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी अटकमवार यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. एटापल्ली तालुक्यातील जाराबंडी आणि पेढांरी गावाला पाटील यांनी भेटी दिल्यात. पाटील यांनी नक्षलविरोधी अभियानाची माहिती घेतली. गृहमंत्री माघारी परत नाही तोच नक्षलवाद्यांनी दोन जणांची हत्या केली आहे.

close