औरंगाबादमध्ये भीषण आगीत 32 दुकानं जळून खाक

May 5, 2012 9:41 AM0 commentsViews: 1

05 मे

औरंगाबाद येथील मुकुंदवाडी परिसरात लागलेल्या भीषण आगीत 32 दुकानं जळून खाक झाली आहे. पी व्ही आर मल्टिप्लेक्सशेजारी असलेली दुकानांची पूर्ण रांग या आगीत भस्मसात झाली आहे. मध्यरात्री लागलेली ही आग पहाटे अग्निशमन विभागाच्या जवानांनी नियंत्रणात आणली. या रांगेतील शूज मार्टमध्ये ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच लागूनच असलेल्या दुकानातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग पाहता पाहता झपाट्याने पसरली. सर्व दुकानं बंद असल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र या आगीत लाखोंचं नुकसान झालं आहे.

close