कोल्हापूरातील रस्त्यांची बिकट अवस्था

November 24, 2008 2:05 PM0 commentsViews: 2

24 नोव्हेंबर, कोल्हापूरसिटीजन जर्नलिस्ट प्रशांत पितालियाकोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. रस्त्यावरुन शहराचा विकास ओळखला जातो. रस्ते त्या शहराचे आरसे असतात. वाहतूक आणि दळणवळणासाठी सर्वात जास्त वापर होतो तो रस्त्यांचा. पण कोल्हापूरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे तेथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. आयबीएन लोकमतचे सिटीजन जर्नलिस्ट बनून प्रशांत पितालिया यांनी रस्त्यांचा प्रश्न मांडला. शहरातील रस्त्यावरुन प्रवास करणार्‍या वाहनचालकांना त्यांनी याबाबतच्या समस्या विचारल्या. ' या रस्त्यांमुळे मानेचे आणि पाठीचे विकार होतात. पाच मिनिटांच्या प्रवासाकरता 15 मिनिटं जातात. आंदोलनं केलं की, पालिकेकडून पॅचवॅर्क केलं जातं. पुन्हा रस्ता जैसे- थै होतो ', असं एका वाहनचालकानं सांगितलं. शहरातील खड्डे ही रहिवाशांची डोकेदुखी झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्‌ड्यात रस्ते, हेच कळत नाही. मुख्यमंत्र्यांचा ताफा ज्या रस्त्यावरुन गेला, त्याचं पॅचवर्क झालं पण बाकीच्या रस्त्यांची तीच अवस्था आहे.

close