पेट्रोल-डिझेलची चोरी करणारी टोळी अटकेत

May 5, 2012 7:49 AM0 commentsViews: 6

05 मे

अहमदनगरमध्ये पेट्रोल आणि डिझेलची चोरी करणार्‍या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. अहमदनगर येथील अकोलणेर डेपोतून अकोला तालुक्यातल्या पेट्रोल पंपावर हे आरोपी पेट्रोल घेऊन जात होते. यावेळी एकूण 9 हजार लीटर डिझेल आणि 3 हजार लिटर पेट्रोल पोलिसांनी ताब्यात घेतलं. बनावट चावीच्या सहाय्याने ही तस्करी सुरु असल्याचं उघड झालंय. या प्रकरणात गाडीच्या चालकासह सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

close