दादासाहेब फाळकेंची कार सापडली

May 4, 2012 4:58 PM0 commentsViews: 2

04 मे

चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांची भंगारमध्ये विकण्यात आलेली कार सापडली आहे. नाशिकच्या गंजमाळमध्ये शिवम गॅरेजच्या अडगळीमध्ये ती पडून आहे. फोर्ड कंपनीची फाळकेंची ही कार त्यांचे सहकारी दादा भट यांच्याकडे होती. त्यानंतर बॅण्डवाले तपकिरेंनी ती भंगारमधून खरेदी केली. शिवम गॅरेजमध्ये रिपेअरिंगसाठी आलेली ही कार ओव्हळ कुटुंबाने सांभाळली. काही काळ लग्नाच्या वरातींसाठीही ती वापरण्यात आली. सध्या अत्यंत जीर्ण अवस्थेत सापडलेली ही कार मनसेतर्फे जतन करण्यात येणार आहे. चित्रपटाच्या जनकाच्या या कारचा प्रवासही चित्रपटाच्या स्टोरीप्रमाणेच झाला आहे.

close