बनावट क्रेडिट कार्ड तयार करणारी टोळी गजाआड

May 5, 2012 9:54 AM0 commentsViews: 3

05 मे

उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईत बनावट क्रेडिट कार्ड तयार करणार्‍या टोळीला गजाआड केलं आहे. क्राईम ब्रँचने दोन आरोपींकडून 573 विविध बँकांचे बनावट क्रेडिट कार्ड आणि 1250 नवीन क्रेडिट कार्डांसह साडे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट क्रेडिट कार्ड पकडण्याची देशातील ही पहिली घटना असल्याच पोलिसांचं म्हणणं आहे. उल्हासनगर शहरातील विजय सेल्स या दुकानात बनावट क्रेडिट कार्डच्या सहाय्याने वस्तू खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन जणांना उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांनी सापळा रचून अटक केली आहे.हितेश गरेला आणि कमलेश लालसिंग अशी या दोन आरोपींची नावं आहेत.

close