उध्दव ठाकरेंचा सांगलीत दुष्काळ दौरा

May 4, 2012 7:31 AM0 commentsViews: 4

04 मे

विदर्भाचा दौरा करुन शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे आज सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाचा दौरा करत आहे. आज उध्दव ठाकरे जतला दाखल झालेत. ज्या 42 गावांनी पाणी टंचाईमुळे कर्नाटकात जायचा इशारा दिला होता. त्यातील काही गावातील शेतकर्‍यांची उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत. पतंगराव कदम सारखे मंत्री राज्याचं दुर्देव असून यांना दांडक्यानं कस मारायचं हे मला चांगल ठाऊक आहे. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा असं उध्दव ठाकरेंनी जनतेला आवाहन केलंय.

close