दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी एनसीटीसी गरजेचं – पंतप्रधान

May 5, 2012 10:42 AM0 commentsViews: 4

05 मे

दहशतवाद ही भारतापुढची मोठी समस्या आहे. त्यामुळे दहशतवादाशी योग्य मुकाबला करण्यासाठी एनसीटीसी (NCTC) यंत्रणा उभी करणं गरजेचं असल्याचं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे. देशांतर्गत सुरक्षा संदर्भात पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिल्लीत सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहेत. या बैठकीत त्यांनी एनसीटीसीच्या यंत्रणेची गरज व्यक्त केली. त्याचबरोबर राज्याच्या अधिकारात ढवळाढवळ करण्याचा उद्देश नसल्याचंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय. मात्र, अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एनसीटीसी यंत्रणेला विरोध केला आहे.

close