सरकारच्या नाकर्तेपणामुळे दमणगंगेचं पाणी गुजरातकडे !

May 5, 2012 11:08 AM0 commentsViews: 3

05 मे

उत्तर महाराष्ट्रातल्या दमणगंगा आणि नारपार नद्यांचं पाणी महाराष्ट्राच्या नाकर्तेपणामुळे हे पाणी गुजरातनं पळवलंय. या प्रस्तावित योजनेमुळे महाराष्ट्राच्या हद्दीतलं आणि महाराष्ट्राच्या हक्काचे दमणगंगा खोर्‍यातील 50 टीएमसी आणि नारपारचं 50 टीएमसी पाणी गुजरातकडे वळवण्यात येणार आहे. हा पाणी करार रद्द व्हावा या मागणीसाठी नाशिकच्या जलसिंचन संस्थेनं याबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला, मात्र त्यांना वाटाण्याच्या अक्षदा लावल्या आहे. खान्देशात पडलेल्या दुष्काळाचा विचार करत सरकारने वेळीच पाऊल उचलून दमणगंगाचे आणि नारपार नद्यांचे पाणी मिळवून द्यावे अशी मागणी संस्थेनं केली.

close