सचिनच्या ओपनिंगवर प्रश्नचिन्ह

November 24, 2008 2:06 PM0 commentsViews: 1

24 नोव्हेंबर बंगळुरूरोमा खन्नाबंगळुरू वनडेत भारतानं दणदणीत विजय मिळवला असला तरी या वन डेत सचिन तेंडुलकरची कामगिरी मात्र फारशी समाधानकारक झाली नाही. तब्बल आठ महिन्यांनंतर सचिन टीममध्ये परतला आणि भारतीय डावाची सुरुवातही केली. पण यात त्याला यश मिळालं नाही. रन्ससाठी त्याला धडपडावं लागलं. त्याला मोठी धावसंख्या करता आली नाही. फक्त 11 रन्सवर असताना स्टुअर्ट ब्रॉडनं त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.आणि सगळ्यांनाच प्रश्न पडला की बॅटिंग ऑर्डरमधलं त्याचं स्थानबदलण्याची गरज आहे का? सचिन आऊट झाल्यावर बंगळुरूमध्ये जो रन्सचा पाऊस पडला त्यामुळे तर या प्रश्नाला दुजोरा मिळाला. गेल्या काही महिन्यात ज्या सफाईनं सेहवाग आणि गौतम गंभीर बॅटिंग करत होते. तितक्याच सहजतेनं ते बाऊंड्रीज मारत होते. शिवाय एक एक दोन दोन रन्सही सहज काढत होते. भारतीय टीमला ते भक्कम सुरुवात करून देत होते. त्यामुळे हीच जोडी पुन्हा ओपनिंगला खेळवण्याचा विचार करायलाच हवा.ओपनर म्हणून सचिनच्या रेकॉर्डची तुलनाच होऊ शकत नाही. पण आता रिटायर होईपर्यंत सचिननं फारशी अनुभवी नसणारी भारताची मिडल ऑर्डर सांभाळावी अशी अनेक जणांची इच्छा आहे. भारतात होणारा 2011चा वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न तो स्वतः बाळगून आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धची ट्राय सीरिज जिंकण्यात सचिनचा मोठा वाटा होता. त्यामुळे त्याचं टीमसाठीच योगदान विसरून चालणार नाही. त्याच्या अनुभवाचा भारतीय टीममधल्या युवा खेळाडूंना नक्कीच फायदा होणार आहे.

close