दूध खरेदी -विक्री बंद करण्याचा संघटनेचा इशारा

May 4, 2012 2:59 PM0 commentsViews: 4

02 मे

दूधाला मिळणार्‍या अपुर्‍या हमीभावामुळे येत्या 15 मेपासून दूध खरेदी विक्री बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघाने दिला आहे. दूधाला मिळणारा हमीभाव वाढवून द्यावा, अशी मागणी संघाने केली आहे. सध्या खर्चात वाढ होतेय, मात्र हमीभावात वाढ होताना दिसत नाही. त्यामुळे दूध व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे, असं संघाचे अध्यक्ष विनायक पाटील यांनी म्हटलं आहे.

close