महाराष्ट्र-आंध्रच्या सीमेवर धरण बांधणार

May 5, 2012 2:26 PM0 commentsViews: 6

05 मे

महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशच्या सीमेवर दोन्ही राज्य मिळून एक धरण बांधणार असल्याचा निर्णय घेतला आहे. आज नवी दिल्लीत याबाबत शिक्कामोर्तब झाला. मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी या करारावर स्वाक्षरी केली. राज्यातली प्राणहीता नदी आणि आंध्रातली चेव्हेल्ला नदीवर हे धरण बांधण्यात येणार आहे. यामुळे गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्याला आणि तेलंगणातल्या 10 जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. यामुळे समुद्रात जाणारे 285 टीएमसी पाण्याची बचत होणार आहे.

close