त्या 10 हजार कोंबड्यांचा मृत्यू ‘मानमोडी’ रोगामुळे

May 4, 2012 1:20 PM0 commentsViews: 40

02 मे

नाशिक जिल्ह्यात मालेगावमध्ये पोल्ट्री फॉर्ममधील 10 हजार कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. लेंढाणे गावातील अविनाश पोल्ट्री फार्ममधल्या या कोंबड्या एकाच रात्रीतून मृत्यूमुखी पडल्या आहेत. कोंबड्यांचे सॅम्पल नाशिकच्या पशुवैद्यकीय विभागाकडे पाठवण्यात आले आहे पोस्टमॉर्टेमनंतर कोंबड्या 'मानमोडी' या रोगप्रादुर्भावामुळे मृत झाल्याचा रिपोर्ट आला आहे. प्रत्येक उन्हाळ्याच्या दिवसात या रोगाचा प्रादुर्भाव होऊन कोंबड्या मृत्युमुखी पडतात. यावर उपाय म्हणून मानमोडी लस दिली जाते पण तरी सुध्दा व्यावसायिकांच्या हाती अपयश येतं. दरम्यान, बर्ड फ्ल्युची शक्यताही पशुवैद्यकीय विभागाने फेटाळून लावली आहे. मात्र, अचानक झालेल्या या घटनेनं मालेगावातील पोल्ट्री व्यावसायिक हवालदिल झाले आहे.

close