’20 हजार कोटी खर्चून सिंचन 0.1 च’

May 4, 2012 4:13 PM0 commentsViews: 2

04 मे

राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत चाललीय आणि आता सिंचनाच्या मुद्द्यावरून खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. गेल्या 10 वर्षात सिंचनावर 20 हजार कोटींहून जास्त रक्कम खर्च झाली. पण सिंचनाची क्षमता फक्त शून्य पूर्णांक एक टक्क्याने वाढली, अशी जळजळीत टीका मुख्यमंत्र्यांनी केली. यावर जलसंपदा विभागाने श्वेतपत्रिका काढावी, अशा सूचनाही ते देणार आहेत. मुख्यमंत्र्यांची ही घोषणा म्हणजे राष्ट्रवादीला खासकरून उपमुख्यमंत्री अजित पवारांना झटका आहे. गेल्या 13 वर्षांपासून जलसंपदा विभाग हा राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी या वादाला पुन्हा एकदा नव्यानं तोंड फुटण्याची चिन्हं आहेत. दरम्यान, सिंचनाच्या मुद्द्यावरून आज जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनीही सरकारला धारेवर धरलं. पैसे आडवा, पैसे जिरवा हेच सरकारचं धोरण असल्यांचं अण्णांनी आज बीडमध्ये म्हटलं आहे.

जनता वार्‍यावर, राज्य 'टँकर'वर !

close