कोलकाता जिंकली, ‘दादा’गिरी धोक्यात

May 5, 2012 3:56 PM0 commentsViews: 1

05 मे

आयपीएलमध्ये सौरव गांगुलीच्या पुणे वॉरियर्स टीमचा सलग पाचवा पराभव झाला आहे. या पराभवाने पुणे टीमचं स्पर्धेतलं आव्हानही धोक्यात आलं आहे. आज कोलकाता नाईट रायडर्सने पुणे वॉरियर्सचा 7 रन्सनं पराभव केला आणि या विजयाबरोबरच कोलकाताने टॉप फोरमध्ये आपलं स्थानही जवळपास पक्कं केलं आहे. कोलकाताच्या ईडन गार्डनवर रंगलेली ही मॅच खरंतर कोलकाता नाईट रायडर्स विरुध्द सौरव गांगुली अशी होती. प्रेक्षकांचा दोघांनाही तितकाच पाठिंबा होता. पण यात नाईट रायडर्सनं बाजी मारली. पहिली बॅटिंग करत कोलकाताने 151 रन्सचं टार्गेट पुणे टीमसमोर ठेवलं होतं. याला उत्तर देताना पुण्याची निम्मी टीम अवघ्या 55 रन्सवर गारद झाली. कॅप्टन सौरव गांगुली आणि अँजेलो मॅथ्युजनं विजयासाठी जोरदार झुंज दिली. पण त्यांना रन्सचा वेग मात्र राखता आला नाही. पुणे टीम 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट गमावत 143 रन्सचं करु शकली.

close