‘एनसीटीसी’ चा तिढा कायम

May 5, 2012 4:36 PM0 commentsViews: 2

04 मे

नॅशनल काऊंटर टेररिझम सेंटर म्हणजेच एनसीटीसी (NCTC) वर सहमती बनवायला केंद्र सरकारला अपयश आलंय. अनेक राज्यांनी एनसीटीसीला कडाडून विरोध केला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी तर एनसीटीसी नाकारलं. राज्यांच्या इच्छेविरुद्ध केंद्र सरकारनं ही यंत्रणा लादण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा ममतांनी दिला. त्यामुळे आता सरकारने एनसीटीसी मधल्या वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक बोलावली. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व राज्यांच्या आक्षेपांचा विचार केला जाईल, असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी दिलं आहे. भारताला दहशतवादाचा धोका आहे. त्याच्याशी सामना करायचा असेल तर एनसीटीसी किंवा त्याच्यासारख्याच सक्षम यंत्रणेची गरज असल्याचं ते म्हणाले. तर राज्यांच्या अधिकारात ढवळाढवळ करण्याचा केंद्र सरकारचा उद्देश नाही, असं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केलं.

close