सांगलीत स्वाभिमानी संघटनेचा धडक मोर्चा

May 7, 2012 12:02 PM0 commentsViews: 3

07 मे

सांगली जिल्ह्यात जत, आटपाडी या तालुक्यांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज जिल्ह्यात भव्य मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीत सरकारकडून शेतकर्‍यांना मदत मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात परिसरातील शेतकर्‍यांसह स्वाभिमानीच्या आंदोलकांनी मोठ्याप्रमाणावर सहभाग घेतला. या मोर्च्यात शेतकर्‍यांनी आपल्यासह गुरा-ढोरांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी सुरक्षाकडे तोडून आंदोलक कार्यालयात घुसले आणि शेतकर्‍यांनी कार्यालयात दूध ओतून निषेध केला.

close