अकोल्यात आईनंच केली मुलाची हत्या

November 24, 2008 2:09 PM0 commentsViews: 5

24 नोव्हेंबर, अकोला ' माता न तू वैरीणी ' असं म्हणावं अशी घटना अकोल्यात घडलीय. अकोल्यात एका आईनंच मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तीन वर्षाच्या हर्षवर निर्घृणपणे चाकूचे 17 वार करण्यात आले. त्यामध्ये तीन वार पोटावर करण्यात आले होते. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती केलं असता त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला चंचलने म्हणजे हर्षच्या आईनं घरात तीन डाकू घुसले आणि त्यांनी हल्ला केल्याचं सांगितलं पण नंतर पोलीस तपासात सत्य समोर आले. हत्या करणार्‍याला ताबडतोब पकडण्यात यावे, अशी मागणी करुन लोकांनी हर्षचा मृतदेह पोलीस स्टेशनमध्येच ठेवला. पोलिसांची तपास चक्र वेगानं फिरू लागली. तपासात पोलिसांच्या लक्षात आलं की, ज्या दिवशी हर्षची हत्या झाली त्या दिवशीचं चंचल दुपारी चाकू खरेदीसाठी बाजारात गेली होती आणि त्याच चाकूने तिने आपल्या मुलाची हत्या केली. पोलिसांच्या म्हण्यानुसार चंचलची मानसिक स्थिती बिघडलीय.

close