दुष्काळासाठी राज्य सरकारचे केंद्राला साकडं

May 7, 2012 4:55 PM0 commentsViews: 1

07 मे

राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत चाललीय. यावर तोडगा काढण्यासाठी आता राज्य सरकार केंद्र सरकारला साकडं घालणार आहे. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. एक तास चाललेल्या या बैठकीत दुष्काळावर चर्चा झाली. या बैठकीला राहुल गांधीसुद्धा उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी आज भेट घेतली असली तरी उद्याही वरिष्ठ मंत्र्यांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री पुन्हा पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकार 2,200 कोटींच्या निधीची फेरमागणी करणार आहे. तसेच मागिल आठवड्यात मुंबईच्या आमदरांशी झालेल्या चर्चेत मुंबईच्या पर्यावरणाचा विषय प्रामुख्याने चर्चेत आला होता.त्यातले मुद्देही मुख्यमंत्री जयंती नटराजन यांच्यापुढे मांडणार आहेत.

close