बिधानला लिंग बदलण्यास कोर्टाची परवानगी

May 7, 2012 1:51 PM0 commentsViews: 4

07 मे

आसामहून मुंबईत आलेल्या 21 वर्षाच्या बिधान बरुआच्या लिंग बदलण्यासाठी हायकोर्टाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता तो बिधानची, स्वाती होणार आहे. लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेला परवानगी देण्यासंबंधी कोणतेही कायदे आपल्याकडे नाही, अशी माहिती केंद्र आणि राज्य सरकारने हायकोर्टाला दिली आहे. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी 8 आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे.

बिधान बरुआची कोर्टातील लढाईही एखाद्यावेळेस हा भारतीय न्यायालयीन प्रक्रियेच्या इतिहासात एक मैलाचा दगड ठरू शकते. कोर्टाच्या या निर्णयामुळे बिधानलाच नाही तर त्याच्या सारख्या अनेकांना याचा फायदा होणार आहे. कोर्टाच्या या निर्णयावर मला मनापासून आनंद झाला आहे आणि लवकरच शस्त्रक्रिया करणार असल्याचं त्याने सांगितलं आहे. बिधानने मुली होण्याचा हट्ट लहानपणापासून करतोय पण आपल्या घरचा दिवा असं काही करणार म्हणून त्याच्या या निर्णयाला घरच्यांनी कडाडून विरोध केला. बिधानला घरात कोंडून ठेवण्यात येतं असत त्याला बेदम मारहाण करण्यात येई एव्हान हा प्रकार इथेच थांबला नाही त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. पण बिधानने घरच्यांच्या विरोधात आपल्या मर्जीसाठी कोर्टात धाव घेतली. आपल्याला मुलगी होऊ द्या अशी याचिका कोर्टात दाखल केली. आज कोर्टाने निर्णय देत बिधानला लिंग बदलाला परवानगी दिली आहे. पण या याचिकेवर सुनावणीसाठी 8 आठवड्यासांठी पुढे ढकलली आहे. पण या दोन महिन्याच्या कालावधीत बिधानची ओळख जगासमोर स्वाती म्हणून होणार आहे.

त्याला मुलगी व्हायचंय !

close