मोलकरणींसाठी कामगार कायदा लागू होणार ?

May 7, 2012 9:24 AM0 commentsViews: 14

07 मे

घरातील धुणी भांडी करुन आपला उदरनिर्वाह भागवणार्‍या मोलकरणींना मोठा दिलासा मिळणार आहे. देशभरातील लाखो मोलकरणींसाठीही कामगार कायदा लागू होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर यात मोलकरणींना आजारपणाची रजा, वार्षिक पगार, सुट्टी, ओव्हरटाईम, पीएफ या सुविधा लागू होणार आहेत. त्यामुळे मोलकरींसाठी हा निर्णय हिताचा ठरणार आहे.

close