पोलिसांच्या मारहाणीमुळे महिलेचा गर्भपात

May 7, 2012 2:31 PM0 commentsViews: 11

07 मे

सातार्‍यामध्ये पोलिसांनी सेक्स वर्करला केलेल्या मारहाणीनंतर त्या महिलेचा गर्भपात झाल्याची धक्कादायक घटना उघडीस आली आहेत. अनु असं या महिलेचं नाव आहे. अनु आणि तिची सहकारी अंजना या दोघींनाही सिनिअर पोलीस इन्स्पेक्टर दयानंद ढोमे यांनी बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी 'वेश्या अन्याय मुक्ती संघटनेतर्फे मुंबई हायकोर्टात प्रायव्हेट पिटीशन दाखल करण्यात आली आहे.

सातार्‍यात दोन सेक्स वर्करना सिनिअर पोलीस इन्स्पेक्टर दयानंद ढोमे यांनी दोन एप्रिल रोजी अनु आणि तिची सहकारी अंजना या दोघींनाही बेदम मारहाण केली. तेव्हा अनु चार महिन्यांची गरोदर होती. मारहाणीनंतर पाच एप्रिलला रात्री अनुचा गर्भपात झाला. त्या दोघी सातारा बस स्टँड जवळ गेल्या असताना दयानंद ढोमे यांनी लाथा बुक्क्यांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर या दोघींनाही पोलीस लॉक अपमध्ये टाकण्यात आलं. मेडिकल चेकअप झाल्यानंतर तिला पोलिसांनी औषधंही घेऊ दिली नाहीत. या दोघीही 'वेश्या अन्याय मुक्ती संघटने'च्या सदस्य आहेत. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या अत्याचाराच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला. यासंदर्भात आर. आर. पाटील यांच्यासोबतही स्त्री मुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चर्चा केली होती. यासोबतच डीएसपी प्रसन्ना यांनी देखील या प्रकरणी चौकशीचं आश्वासन दिलं होतं. मात्र एक महिना उलटून गेला तरी याप्रकरणात कोणतीच चौकशी झाली नसल्याची या महिलांची तक्रार आहे. आता संघटनेतर्फे मुंबई हायकोर्टामध्ये प्रायव्हेट पिटीशन दाखल केली जाणार आहे.

close