‘प्लास्टिक पिशव्यांवर होऊ शकते पूर्णपणे बंदी’

May 7, 2012 9:39 AM0 commentsViews: 77

07 मे

प्लास्टिक पिशव्यांच्या वापरामुळे नेहमी निर्माण होणार्‍या कचर्‍याच्या समस्या आणि पर्यावरणाला हाणीकारक असणार्‍या प्लास्टिक पिशव्यांवर पूर्णपणे बंदी घालण्याचा विचार होऊ शकतो असं मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलंय. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि प्लास्टिक बॅग निर्मिती करणार्‍यांना नोटीस बजावली आहे. प्लास्टिक बॅगवर बंदी घालण्यासंदर्भात एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने ही नोटीस बजावली आहे. प्लास्टिक पिशव्या जनावरं खातात, त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण होतो असा युक्तीवाद या याचिकेत करण्यात आला आहे.

close