पाण्यासाठी काँग्रेसचे आमदार रस्त्यावर

May 7, 2012 3:10 PM0 commentsViews: 6

07 मे

राज्यात दुष्काळाच्या परिस्थितीवर राज्य सरकारने पंतप्रधानांकडे साकडं घातलं आहे. पण आता पिण्याचं पाणी मिळावं यासाठी काँग्रेसच्या आमदारांनीच आंदोलन सुरु केलं आहे. आमदार दिलीप माने यांनी तर जिल्हाधिकार्‍यांसह पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना कोंडून ठेवलंय. सीना कोळेगाव धरणातील उत्तर आणि दक्षिण सोलापूर तसेच अक्कलकोट या भागांना मिळतच नाही. उजनी धरणाच्या पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे सीना नदीत पाणी सोडणं शक्य नाही. त्यामुळे शेजारच्या उस्मानाबाद जिल्हयातल्या सीना कोळेगाव मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात येतेय. माढा आणि मोहोळ तालुक्यातले बंधारे तर भरलेले आहेत पण अक्कलकोट सारखे तालुके तहानलेलेच आहेत, म्हणूनच संतप्त झालेल्या सीना नदीकाठच्या शेतकर्‍यांनी दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं. या शेतकर्‍यांनी गेल्या आठ तासांपासून जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांच्यासह पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना जिल्हाधिकारी कार्यालयात कोंडून ठेवलंय. सीना नदीमध्ये जोपर्यंत पाणी सोडलं जात नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातून उठणार नाही असा इशाराही आमदारांनी दिलेला आहे.

close