फ्रान्समध्ये सार्कोजींचा पराभव, हॉलांद होणार नवे राष्ट्रपती

May 7, 2012 10:11 AM0 commentsViews: 2

07 मे

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत निकोलस सार्कोझी अखेर पराभूत झाले आहेत. समाजवादी नेते फ्रॅन्काईस हॉलांद यांनी सार्कोझी यांचा पराभव केला. सार्कोझी यांना दुसर्‍या टप्यातील मतदानात 48 टक्के मते मिळाली तर हॉलांद यांना 52 ते 53 टक्के मतदान झाल्याच स्पष्ट होतंय. हॉलांद यांच्या रुपात फ्रान्समध्ये तब्बल दोन दशकानंतर समाजवादी नेता राष्ट्राध्यक्षपदी परतला आहे. आर्थिक विकास या मुद्यावर हॉलांद यांनी ही निवडणूक लढवली होती. बेरोजगारीचा दर 10 टक्यावर आल्यामुळे सार्कोझी यांना मतदारांनी नाकारलंय. पण युरोपीयन राष्ट्रातील आर्थिक संकटामुळे आतापर्यंत तब्बल 11 राष्ट्राध्यक्षांना सत्तेतून पायउतार व्हावं लागले आहे.

close