वसुंधरा राजेंचं नितीन गडकरींनाच आव्हान

May 7, 2012 4:31 PM0 commentsViews:

07 मे

राजस्थान भाजपमध्ये सध्या मोठा वाद उफाळून आला आहे. कमालीच्या नाराज झालेल्या वसुंधरा राजे यांनी आता थेट पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांनाच आव्हान दिलंय. राजे यांनी पक्ष सोडण्याचा इशारा दिल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी त्यांना दिल्लीला पाचारण केलं होतं. पण वसुंधरा राजेंनीदिल्लीला जाण्यास नकार दिला आहेत. भाजपचे नेते गुलाबचंद कटारिया यांच्या प्रस्तावित यात्रेला वसुंधरा राजेंनी विरोध करत पक्ष सोडण्याचा इशारा दिलाय. राजे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांच्या 60 समर्थक आमदारांनी राजीनाम्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता पक्ष काय कारवाई करतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

close