बदलापूरमध्ये कचर्‍यापासून खताचा प्रकल्प

November 24, 2008 2:14 PM0 commentsViews: 112

24 नोव्हेंबर, बदलापूर सध्या मुंबई आणि आसपासच्या भागात डंपिंग ग्राऊंडवरुन प्रश्नचिन्ह असताना कुळगाव बदलापूर नगरपालिकेनं कचर्‍यापासून खत निर्मीतीचा प्रकल्प सुरू केला आहे. या समस्येतून सुटकेच्यादृष्टीनं पावलं टाकलीत. सुमारे 2 लाख लोकसंख्या असणार्‍या या शहरातून 50 टन ओला आणि सुका कचरा निर्माण होतो. त्यात 60 टक्के ओला आणि 40 टक्के सुका कचरा असतो. गेली दोन वर्ष डंपिंग ग्राऊंडवरुन इथे वाद सुरू आहे. या खत प्रकल्पात एका वेळी 100 किलो ओल्या कचर्‍यावर 15 मिनिटं प्रक्रिया करावी लागते. या कचर्‍याची दुर्गंधी नष्ट व्हावी, यासाठी बायोकल्चर आणि लाकडाचा भुसा वापरला जातो. त्यानंतर निर्माण झालेल्या चुर्‍याला 10 दिवस कुं डीत ठेवल्यानंतर त्याचं सेंद्रीय खतात रुपांतर होतं. या प्रकल्पावर इथले रहिवासी खूष आहेत. ' डंपिंग ग्राऊंड प्रश्नावर हा चांगला उपाय आहे. यातून आयती खतं उपलब्ध होतील ' , असं रहिवासी प्रकाश टाकसाळकर यांनी सांगितलं.

close