सोन्यावरील उत्पादन शुल्क मागे

May 7, 2012 10:24 AM0 commentsViews: 7

07 मे

देशभरातल्या सराफांच्या गेल्या महिन्यात केलेल्या आंदोलनाला अखेर यश आलंय. केंद्र सरकारने सोने व्यापार्‍यांना दिलासा दिला आहे. आपला शब्द पाळत, अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी लोकसभेत सोन्यावरील उत्पादन शुल्क हटवल्याची घोषणा केली.तसेच जीएएआर 2013-14 मध्ये लागू होणार अशी घोषणाही प्रणवदांनी केली. तसेच नवीन कायदाही सरकारने स्थगित केला आहे. 2 लाखापर्यंत 1 टक्का टीडीएस (TDS) रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना याचा फायदा होईल. विशेष म्हणजे देशाच्या अर्थसंकल्पात ब्रँडेड ज्वेलरीवर एक्साईज ड्युटी लागू करण्यात आली होती. या निर्णयामुळे देशभरात सराफांनी 21 दिवसांचा संप केला होता. त्याचबरोबर 10 पेक्षा जास्त मुख्यमंत्र्यांनीही याला विरोध केला होता. तर कॅबिनेट मंत्र्यांनी लिखित स्वरुपात नाराजी व्यक्त केली होती अखेर प्रणवदांनी आपला शब्द पाळत सोन्यावरील उत्पादन शुल्क मागे घेतले आहे. सराफांना या घोषणेमुळे दिलासा मिळाला आहेच पण ग्राहकांनी याचा फायदा होणार आहे.

close