वाशिममध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळला

May 7, 2012 10:58 AM0 commentsViews: 25

07 मे

वाशिम जिल्हात कारंजापासून 10 किलोमीटर अंतरावर शहा फाट्याजवळ हा बिबट्या मृतावस्थेत सापडला. घटनेची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मृत बिबट्याचा पंचनामा करुन या बिबट्याला पोस्टमार्टमसाठी सोहोळ अभयारण्यात नेण्यात आलं आहे. या बिबट्याला विष दिल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागानं व्यक्त केला आहे. या पुर्वीही या भागात एक बिबट्याचा असाच संशयास्पदरीत्या जखमी अवस्थेत आढळला होता.

close