मंत्र्यांच्या बंगल्यात ‘धबधबे’ !

May 7, 2012 5:47 PM0 commentsViews: 11

07 मेराज्यात एकीकडे दुष्काळामुळे पाणी टंचाई असताना राज्यातले मंत्री मात्र भरमसाट पाणी वापरत आहेत. माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही बाब उघड झाली आहे. एप्रिल 2011 ते मार्च 2012 या एका वर्षात महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या पाणी बिलाचे आकडे काही लाखांपर्यंत पोहोचले आहेत. आज दुष्काळग्रस्त भागात लोकांना पाणी पैसे देऊन विकत घ्यावे लागत आहे तर दुसरीकडे मंत्र्यांच्या पाणी वापरामुळे बिलं लाखांच्या घरात पोहचली. हे पाहुन मंत्र्यांच्या घरी काय पाण्याचे धबधबे वाहत होती का ? असा प्रश्न सहज सर्वसामान्याच्या मनात उपस्थित होईल. पाहुयात हे मंत्री कोण आहेत आणि त्यांचा पाणी वापर किती आहे.

मंत्र्यांची पाणी बिलं

1. पृथ्वीराज चव्हाण – मुख्यमंत्रीवर्षा आणि तोरणा बंगलाबिल – 2 लाख 81 हजार 737 रु.

2. छगन भुजबळ -सार्वजनिक बांधकाम मंत्री रामटेक बंगलाबिल – 2 लाख 49 हजार 912 रु.

3. आर.आर.पाटील -गृहमंत्री चित्रकूट बंगालाबिल – 1 लाख 98 हजार 34 रु.

4. हर्षवर्धन पाटील – सहकार मंत्री पर्णकुटी बंगलाबिल – 1 लाख 70 हजार 10 रु.

5. अनिल देशमुख – अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री जेतवन बंगलाबिल – 3 लाख 3 हजार 313 रु.

6. जयदत्त क्षीरसागर – सार्वजनिक बांधकाम मंत्री (MSRDC) सातपुडा बंगलाबिल – 2 लाख 56 हजार 893 रु.

close