दादासाहेब फाळके यांना भारतरत्न द्यावा – राऊत

May 7, 2012 11:23 AM0 commentsViews: 2

07 मे

चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. चित्रपट सृष्टीने 3 मे रोजी 100 वर्ष पूर्ण केली आहे. दादासाहेबांनी 'राजा हरिश्चंद्र' चित्रपट करुन चित्रपट सृष्टीची खर्‍या अर्थाने सुरुवात केली. चित्रपट सृष्टीला समृध्द करणारे दादासाहेब फाळके यांना भारतरत्न देण्यात यावा तसेच फाळके यांच्या नावानं पोस्टाचं तिकीटही काढण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

close