सेहवाग – गंभीर आज आमने सामने

May 7, 2012 11:42 AM0 commentsViews: 3

07 मे

आयपीएलमध्ये सोमवारी या हंगामातल्या दोन बलाढ्य टीममध्ये मुकाबला रंगणार आहे. विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर ही भारतीय क्रिकेट टीमची ओपनिंग जोडी आमने सामने येणार आहेत. दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही टीम सध्या जबरदस्त फॉर्मात आहेत. पॉईंटटेबलमध्ये दिल्लीची टीम पहिल्या तर कोलकाताची टीम दुसर्‍या क्रमांकावर आहे. दिल्लीचा धडाकेबाज बॅट्समन केविन पीटरसन मायदेशी परतला असला तरी डेव्हिड वॉर्नर टीममध्ये दाखल झाला आहे. तर कोलकाता टीममध्ये जॅक कॅलिस, ब्रँडन मॅक्युलम अशा दर्जेदार बॅट्समनचा समावेश आहे. पण या मॅचमध्ये खरी चुरस असणार आहे ती दिल्लीचा कॅप्टन विरेंद्र सेहवाग आणि कोलकाताचा कॅप्टन गौतम गंभीर दरम्यान. दोन्ही बॅट्समन सध्या टॉप फॉर्ममध्ये आहेत. सर्वाधिक रन्स करणार्‍या बॅट्समनच्या यादीतही सेहवाग दुसर्‍या तर गंभीर तिसर्‍या क्रमांकावर आहे. त्यातच ही मॅच जिंकणारी टीम पॉईंटटेबलमध्येही पहिल्या क्रमांकावर पोहचणार आहे..

close