वर्ध्यातील मदन उन्नईचा प्रकल्प शोभेचाच

November 24, 2008 3:25 PM0 commentsViews: 7

24 नोव्हेंबर वर्धानरेंद्र मतेशेतक-यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून वर्धा जिल्ह्यात लघु पाटबंधारे विभागानं मदन उन्नई प्रकल्पातून कालवा काढला. पण त्यासाठी तयार केलेल्या पाटच-या मात्र कागदोपत्रीच आहेत. त्यामुळे आज 4 वर्ष लोटूनही शेतांमध्ये पाणी पोहोचलेलं नाही. शेतक-यांना रब्बी हंगामातही पाण्यापासून वंचित राहावं लागतं आहे. वर्धा जिल्ह्यातल्या सुकळी इथले शेतकरी चतुरसिंग बंडवार त्यांच्या कोरडवाहू शेतातून 2004 मध्ये मदन उन्नई प्रकल्पाचा कालवा काढण्यात आला. पण अजूनही त्यांच्या शेतात पाणी पोहोचलं नाही. कालव्याच्या पाटच-याही आता बुजून गेल्या आहेत. 2004 मध्ये पूर्ण झालेल्या मदन उन्नई प्रकल्पाचे 2 कालवे आहेत. प्रत्येकी 1141 हेक्टर आणि 1394 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचं नियोजन आहे. प्रकल्पात यावर्षी 100 टक्के जलसाठा आहे. पण पाटच-याच उपलब्ध नसल्यानं शेतीला पाणीच मिळत नाही. विशेष म्हणजे पाटच-या कागदोपत्री तयार होऊन देयकंही उचलण्यात आली आहेत. आत्तापर्यंत 2500 हेक्टर क्षेत्रांपैकी केवळ 200 ते 250 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आलं आहे. सिंचन क्षेत्राच्या गलथान कारभारामुळे या प्रकल्पांतर्गत येणा-या सुकळीसहित 9 गावांतल्या शेतक-यांना सिंचनापासून वंचित रहावं लागत आहे. एकूणच मदन उन्नईचा प्रकल्प भ्रष्ट प्रवृत्तीमळे सध्यातरी शोभेचाच असल्याचं दिसत आहे.

close