दुष्काळासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र यावे – शरद पवार

May 9, 2012 9:31 AM0 commentsViews: 1

09 मे

दुष्काळासारख्या प्रश्नावर मतभेद सोडून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केलंय. कोणत्याही प्रश्नावर प्रांत वादाची नाही तर तर राज्याच्या ऐक्याची गरज आहे असं ते म्हणाले. त्याचबरोबर राज्याच्या दुष्काळाच्या प्रश्नावर केंद्राचा असहकार असल्याचा आरोप चुकीचा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. सातार्‍यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 53 व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त सातार्‍यामधल्या रयत शिक्षण संस्थेत, समाधी परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्यकर्माचं आयोजन केलं जातं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार , पतंगराव कदम हे उपस्थित होते.

close