दुष्काळग्रस्तांना मनसेचा मदतीचा हात

May 9, 2012 9:53 AM0 commentsViews: 1

09 मेमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार मनसेचे आमदार आणि पदाधिकार्‍यांनी राज्याचा दुष्काळी भागाचा दौरा सुरु केला आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त भागात मोफत चारा वाटप आणि पाण्याचे टँकर पोहचवले जात आहे. मनसेचे आमदार प्रविण दरेकर हे मुंबईहुन 5 ट्रक चारा आणि 3 पाण्याचे टँकर घेऊन सातारा जिल्ह्यात गेले आहे. माण आणि खटाव तालुक्यातील दुष्काळी गावांमध्ये चारा आणि पाण्याची व्यवस्था ते करणार आहे. तसेच मराठवाड्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रातही मनसे नेत्यांनी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या राजापूरमध्ये टँकरनं पाणी पुरवठा करण्यात आला. त्याचबरोबर या भागात मोर आणि हरीणही मोठ्याप्रमाणात आहेत. त्यांचीही पाण्याअभावी आबाळ होतेय. इथं मनसेचे आमदार नितीन भोसले यांनी थेट राजापूरच्या जंगलात मोरांसाठी आणि हरणांसाठीही टँकरने पाणी पोहोचवलं.

close