पाणीटंचाईचा राज्यात दुसरा बळी

May 9, 2012 10:08 AM0 commentsViews: 1

09 मे

पाणीटंचाईमुळे ठाणे जिल्ह्यातल्या मोखाड्यामध्ये एका महिलेचा बळी गेल्यानंतर आता आणखी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेलेल्या एका आदिवासी महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. मालेगाव तालुक्यातल्या वळवाडी गावातली ही घटना आहे. रखूबाई सोनवणे ही आदिवासी महिला विहिरीच्या कडेवर उभी राहून पाणी भरत असताना तोल गेल्यामुळे विहिरीत पडली. या विहिरीत अगदी थोडं पाणी होतं. दगडावर डोकं आदळल्यानं तिचा मृत्यू झाला. ज्या विहिरीत रोज पाणी भरण्यासाठी रखूबाई जात होत्या त्याच विहिरीत पडून मृत्यू झाल्याने गावकरी हळहळ व्यक्त करतायच. या गावाने गेल्या अनेक दिवसांपासून टँकरची मागणी केली. पण अजून टँकर मिळालेला नाही. मोखाडा तालुक्यातल्या डोलार्‍याच्या पार्वती जाधव यांचा पाण्यासाठी अगोदर मृत्यू झाला होता. शिवाय या गावात एकच विहीर आहे. त्यामुळे विहिरीवर नेहमीच मोठी गर्दी असते.

close