तिचं देवाशी लग्न टळलं

May 8, 2012 6:03 PM0 commentsViews: 13

08 मे

तमाशात काम करणारी 17 वर्षाची सोनाली…वर्षभरापासून पोटाच्या आजारामुळे त्रस्त झाली…सगळे उपचार झाले पण काही फरक पडला नाही…आजारातून बरी होईल म्हणून तिच्या आत्यानं खंडोबाला नवस केला 'पोरगी बरी झाली तर तुझ्याशी लग्न लावेल'….ठरल्याप्रमाणे लग्नाची तयारी होते… 8 मेचा मुहूर्त ठरतो…ऐनवेळी अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते देवासारखी धाव घेता आणि लग्न टळलं..अंधश्रध्देच्या या अघोरी प्रकारातून तीचा सुटका होते….ही कथा चित्रपटातील नव्हे तर खर्‍याखुर्‍या माणसांची आहे पण ती जखडली आहे अंधश्रध्देनं….

अहमदनगर जिल्हातल्या पाथर्डी तालुक्यात सोनाली औंधकर ही तमाशाच्या फडात नृत्यांगना आहे. गेल्या वर्षभरापासून पोट दुखीच्या आजारामुळे त्रस्त होती. तिच्या आत्याने खंडोबाला नवसा केला. 'पोरगी बरी झाली तर तिचं लग्न तुझ्याशी लावेल'असा नवस केला होता. ठरल्याप्रमाणे आज 8 मेचा मुहूर्त ठरतो. तमाशातील एका मुलीच लग्न देवाशी लावणार अशी खबर अंधश्रध्दा निर्मूलनचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांना कळते. मग हा अघोरी प्रकार रोखण्यासाठी कृष्णा आणि चार पोलीस सोनालीचा गावोगावी शोध घेतला पण काही पत्ता लागला नाही.

अखेर तालुका श्रीगोंदे येथे सोनालीचा तमाशा होणार अशी माहिती मिळाली. कृष्णा आणि पोलिसांनी तेथे गेले आणि सोनाली आणि तिच्या आत्याची समजूत काढली. देवाशी लग्न करणे चुकीचे आहे. जर तिचं लग्न झालं तर तिचं आयुष्य उध्दवस्त होईल असं पटवून दिलं. पण आत्याला भीती होती की, नवस फेडला नाही तर खंडोबा नाराज होईल आणि सोनाली परत आजारी पडले. पण असं काही होणार नाही असं कृष्णा यांनी पटवून दिलं. अखेर आत्यांचं मन परिवर्तीत झालं त्यांनी खंडोबाशी लग्न करणार नाही असं लेखी लिहून दिले.

अंधश्रध्दा निर्मूलन समितीनेही तिच्या उपचाराचा खर्च उचलणार असं जाहीर केलं. तमाशा मालकानेही तिच्या लग्नासाठी आर्थिक मदत देऊ केली. सोनालीचाही या लग्नाला विरोध होता पण आत्याने नवस केला म्हणून आत्याच्या शब्दाबाहेर तिलाही जाता आलं नाही. पण कृष्णा चांदगुडे यांनी वेळीच घेतलेल्या भेटीमुळे सोनालीचे देवाशी लग्न टळलं.

close