हा राजकीय आरोप – प्रवीण तोगाडीया

November 24, 2008 2:21 PM0 commentsViews: 3

24 नोव्हेंबर, मुंबई मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी आणखी महत्त्वाची माहिती पुढे येत आहे. अभिनव भारतला विश्व हिंदु परिषदेचे नेते प्रवीण तोगडीया यांनी आर्थिक मदत केल्याचा दावा लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितनं केलाय. अभिनव भारत संघटना सुरू करण्यासाठी तोगडीया यांनी मदत केल्याची माहिती कर्नल पुरोहितनं दिली आहे. सीबीआयच्या चौकशीदरम्यान ही माहिती पुढे आल्याचं सीबीआयच्या सूत्रांनी सांगितलंय. दरम्यान, प्रवीण तोगडीया यांनी या सगळ्या आरोपांचा इन्कार केलाय. हा आरोप राजकीय असल्याचं त्यांनी म्हटलंय.

close