नागपूरमध्ये चोर समजून तिघांचा दगडाने ठेचून खून

May 9, 2012 11:11 AM0 commentsViews: 5

09 मे

नागपूरमध्ये आज एक भयंकर प्रकार घडला. चोर समजून जमावाने तीन निरपराधांची भरदिवसा हत्या केली. जोगवा मागणार्‍या तीन जणांना अक्षरशः दगडानं ठेचून मारण्यात आलंय. या प्रकरणी 14 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

सकाळी 9.30 ची वेळ…नागपूर शहरातल्या कळमना भागात देवीच्या नावाने जोगवा मागणार्‍या तीन तरुणांची दिवसा ढवळया हत्या करण्यात आली. महिलांच्या वेशात असणार्‍या चौघांवर चोर समजून परिसरातल्या लोकांनी हल्ला केला. चिडलेल्या जमाव हिंसक झाला.. आणि पाहता पाहता.. तिघांची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली. एकाला पोलिसांनी वाचवलं. तो गंभीर जखमी आहे.

या भागात चोरीच्या घटना वाढल्यात. त्यामुळेच संतापलेल्या लोकांनी चोर समजून हे कृत्य केल्याचं सांगत पोलीस अधीक्षकांनी लोकांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. पण नागपुरातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी मात्र या घटनेचा निषेध केला आहे.

पोलिसांनी याप्रकरणी 20 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर 12 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. मृत्यू पावलेले तिघेही बुलडाणा जिल्ह्यातल्या दामूद गावचे भराडी समाजाचे भिक्षुक होते. त्यांना हकनाक आपला जीव गमवावा लागला आहे.

close