मुंबई- बंगलोर आमने सामने

May 9, 2012 11:20 AM0 commentsViews: 1

09 मे

आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आमने सामने येणार आहेत. यंदाच्या हंगामात या दोन्ही टीमदरम्यानची ही पहिलीच लढत आहे. घरच्या मैदानावर खेळणार्‍या मुंबई इंडियन्सचं पारडं या मॅचमध्ये जड आहे. सलग तीन विजय मिळवत मुंबईने पॉईंट टेबलमध्येही तिसर्‍या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यामुळे बंगलोरविरुध्दची मॅच जिंकत टॉप फोरमध्ये आपलं स्थान भक्कम करण्याची मुंबईला चांगली संधी आहे. पण गेल्या मॅचमध्ये डेक्कन चार्जर्सला हरवत बंगलोर रॉयनं स्पर्धेत कमबॅक केलं आहे. ख्रिस गेल, विराट कोहली, दिलशान असे भक्कम बॅट्समन टीममध्ये आहेत. पण टीमची प्रमुख मदार असणार आहे ती एबी डिव्हिलिअर्सवर..डिव्हिलिअर्स सध्या तुफान फॉर्मात आहे. डेक्कनविरुध्द अशक्य वाटणारा विजय डिव्हिलिअर्सनं खेचून आणला होता. त्यामुळे मुंबईच्या बॉलर्ससमोर ख्रिस गेलबरोबरच डिव्हिलिअर्सला झटपट आऊट करण्याचं प्रमुख आव्हान असणार आहे.

close