दहशतवादाच्या लढाईत अमेरिका भारतासोबत – हिलरी क्लिंटन

May 8, 2012 1:56 PM0 commentsViews: 3

08 मे

अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन या सध्या भारताच्या दौर्‍यावर आहेत. आज त्यांनी परराष्ट्रमंत्री एस.एम.कृष्णा यांची भेट घेतली. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिका भारतासोबत आहे, असं स्पष्ट करतानाच भारतानं इराणकडून इंधन घेण्याचं प्रमाण कमी करावं असं आवाहनही हिलरी क्लिंटन यांनी केलं आहे. पण इराणकडून इंधन घेण्याच्या धोरणाबाबत भारत सर्व मुद्यांचा विचार करुन निर्णय घेईल असं एस.एम.कृष्णा यांनी स्पष्ट केलंय. तसेच पाकिस्ताननं आपल्या भूमीचा वापर दहशतवादासाठी होऊ नये याची खबरदारी घ्यावी असंही त्यांनी सुनावलं.

close