नाशिकमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीला भीषण आग

May 9, 2012 7:36 AM0 commentsViews: 2

09 मे

नाशिकमध्ये महिंद्रा ऍंड महिंद्रा कंपनीच्या प्लांटमध्ये सकाळी भीषण आग लागल्यामुळे कोट्यावधीची यंत्रसामुग्री जळून खाक झाली आहे. सातपूर एम आय डी सी मध्ये ही घटना घडली. घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. तब्बल 4 तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पण कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होतोय. मात्र ही आग कशी लागली याची याबद्दल अजून खुलासा झालेला नाही.

close