राजस्थानचा ‘रॉयल’ विजय ; ‘दादा’गिरी संपली

May 8, 2012 2:11 PM0 commentsViews: 2

08 मे

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सने पुणे वॉरियर्सचा 7 विकेट राखून दणदणीत पराभव केला आहे. पहिली बॅटिंग करणार्‍या पुणे वॉरियर्सने विजयासाठी 126 रन्सचं माफक आव्हान ठेवलं होतं.याला उत्तर देताना राजस्थान रॉयल्सची सुरुवातही खराब झाली. शेन वॉट्सननं नॉटआऊट 90 रन्स करत टीमला शानदार विजय मिळवून दिला. पुणे टीमचा हा नववा पराभव ठरलाय, आणि या पराभवामुळे आयपीएलच्या पाचव्या हंगामातलं पुणे टीमचं आव्हान आता संपुष्टात आलं आहे.

close