सासरच्या घरासमोर नवविवाहितेवर अंत्यसंस्कार

May 9, 2012 12:30 PM0 commentsViews: 17

09 मे

आजोबांच्या अस्थी घेऊन पैठणला का गेली म्हणून संतप्त झालेल्या सासरच्या मंडळीनी नवविवाहितेचा गळा दाबून हत्या केली. सुवर्णा खेडेकर असं या नवविवाहितेच नाव आहे. सुवर्णाच्या लग्नाला जेमतेम 22 च दिवस झाले होते. त्यामुळे संतापलेल्या सुवर्णाच्या माहेरच्या लोकांनी सुवर्णाचा अंत्यविधी सासरच्या घरासमोरचं केला. याप्रकरणी पती परमेश्वर खेडेकरला अटक करण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील पारोडी गावातील परमेश्वर खेडेकर याच्याशी सुवर्णी खेडेकरचं 22 दिवसांपुर्वी लग्न झालं. माहेरचा उंबरठा ओलांडून आलेल्या सुवर्णाचा संसार गुण्यागोंविदाने सुरू झाला. दोनच दिवसांपुर्वी आजोबांचे दिर्घआजारामुळे निधन झाल्यामुळे सुवर्णाला माहेर परतावे लागले यावेळी पती,सासु, सासरेही सोबत होते. अग्नीदहनचा कार्यक्रम आटोपून सासरची मंडळी गावी परतली. दुसर्‍यादिवशी सुवर्णा आणि तिचे कुटुंबीय आजोबांच्या अस्थी घेऊन पैठणाला गेले. सुवर्णा सासरी परतल्यानंतर आपल्या का सांगून गेली नाही याचा राग धरून पती परमेश्वरने सुवर्णाला बेदम मारहाण केली आणि गळा दाबून हत्या केली. रागाच्या भरात आपल्या हातून घडलेल्या प्रकारामुळे भयभीत झालेल्या परमेश्वर आणि सासरच्या मंडळीनी सुवर्णाने फाशी घेतली असं चित्र निर्माण केलं. या प्रकरणी सुवर्णाच्या माहेरच्या लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये पती परमेश्वर आणि सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र 22 दिवसांपूर्वी ज्या सुवर्णाचे हात दोनाचे चार करुन दिले तिची शुल्क कारणावरून हत्या झाल्याने संतापलेल्या सुवर्णाच्या कुटुंबीयानी आज सुवर्णाचा अंत्यविधी सासरच्या घरासमोरचं केला. यावेळी संतप्त झालेल्या सुवर्णाच्या नातेवाईकांनी घरातल्या वस्तू फेकून दिल्या. याप्रकरणी कलम 302 खाली परमेश्वरला अटक करण्यात आली.

close