शिक्षण सम्राटांवर गुन्हे दाखल कारवाई सुरु

May 9, 2012 12:59 PM0 commentsViews: 64

09 मे

संपूर्ण राज्यात शिक्षण सम्राटांचं पितळ उघडं करणारी शाळांंमध्ये पट-पडताळणी मोहीम राबवण्यात आली होती. त्यात दोषी आढळलेल्या शिक्षण सम्राटांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई आजपासून सुरू झाली आहे. नांदेडमधून या कारवाईची सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील 267 शाळांच्या संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांविरुध्द गुन्हे नोंदवण्यात येणार आहेत. राज्यात जवळपास अडीच हजार शाळांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. पटपडताळणी मोहिमेत अनेक शाळांमध्ये बोगस विद्यार्थी बसवण्यात आल्याचं उघड झालं होतं. यामध्ये 10.16 टक्के बोगस विद्यार्थी आढळले होते. 20 ते 50 टक्के अनुपस्थिती गैरहजेरी असणार्‍या शाळांतल्या शिक्षक आणि कर्मचार्‍यांना दुसरीकडे पाठवण्यात येणार आहे. 50 टक्यांपेक्षा जास्त गैरहजेरी असलेल्या शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच पटपडताळणीचे खोटे अहवाल देणार्‍या अधिकारर्‍यांवर कारवाई केली जाणार आहे.

close