कोळशाच्या कमतरतेमुळे राज्यात वीजटंचाई – सुशीलकुमार शिंदे

November 24, 2008 3:06 PM0 commentsViews: 10

24 नोव्हेंबर, पुणे देशभरात कोळशाची कमतरता असल्यानं राज्यालाही वीजटंचाईचा फटका बसला आहे. राज्य सरकार गुजरातकडून वीज मिळवण्याचा प्रयत्न करतंय. पण पूर्ण देशभरातच विजेचा तुटवडा जाणवतोय, असं केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पुण्यात सांगितलं.राज्यातील वीजतुटवड्याबद्दल बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की दुसर्‍या राज्यातून वीज घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गुजरात सरकारशी बोलणंही झालं आहे. येत्या काही दिवसांत वीज परिस्थिती गंभीर होणार आहे. गॅसवर चालणारे दोन सयंत्र दुरूस्तीच्या कारणास्तव 25 ते 26 दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे परिस्थिती गंभीर आहे. पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्रमानिमित्त ते पुण्यात आले होते. विद्यापीठाच्यावतीनं केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि राम शेवाळकर यांना डी.लिट पदवी देऊन गौरवण्यात आलं. विद्यापीठाचे कुलपती सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी पवारांवर स्तुतीसुमनं उधळली. लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, असं पवारांनी जाहीर केलं होतं. त्यावर शिंदेंनी महाराष्ट्राला आणि देशाला तुमची गरज आहे, असं सांगितलं आणि रिटायरमेंटची भाषा करू नका, असं आर्जवही केलं.

close