पक्षातील गटबाजी बंद करा – सोनिया गांधी

May 9, 2012 1:27 PM0 commentsViews: 48

09 मे

काँग्रेस संसदीय समितीच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी आज काँग्रेस नेत्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. पक्षातल्या बेशीस्तीवर त्यांनी नेत्यांना खडेबोल सुनावले. गेल्या काही निवडणुकांतील पराभवाच्या कारणाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पक्षातील बेशीस्तीवर नियंत्रण घालण्याची गरज व्यक्त केली. त्याचबरोबर पक्षातील गटबाजी बंद करा अशी समजही त्यांनी नेत्यांना दिली. देशाच्या जनतेचं आपल्याकडे लक्ष आहे याचं सगळ्यांनी भान ठेवावं असंही त्यांनी सुनावलं. ठिकठिकाणी झालेल्या निवडणुकांमधे दारुण पराभव झाल्यानंतर सोनीया गांघी पहिल्यांदाच आपल्या खासदारांशी सोनियांनी संवाद साधला. अलीकडे झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुका, राज्यातील महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकांचा अहवाल या अगोदर काँग्रेस प्रदेशअध्यक्षांनी सादर केला होता.

close